नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan Passess Away) यांच्या निधनावर सर्वपक्षीय नेत्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या ७४ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर पंतप्रधान यांनीही शोक व्यक्त केलाय. ‘मी हे दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही. त्यांच्या निधनानं जी पोकळी निर्माण झालीय ती कुणीही भरू शकत नाही. रामविलास पासवान यांचं निधन माझ्यासाठी खासगी क्षती आहे. मी एक मित्र, मौल्यवान सहकारी आणि गरिबांचं सन्मानासहीत आयुष्य सुनिश्चित करणारा एक व्यक्ती गमावला आहे’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

रामविलास पासवान मोठ्या मेहनतीनं आणि निर्धारानं राजकारणात पुढे आले. एक नेता म्हणून त्यांनी आणीबाणीच्या काळात अत्याचार आणि लोकशाहीवरच्या हल्ल्याला विरोध केला. ते एक कुशल खासदार आणि मंत्री होते, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

वाचा :


वाचा :

वाचा :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलीय. ‘पासवानजीच्या निधनानं एका मानवतावादी नेत्याला आपण मुकलोय. गरीब आणि वंचितांसाठी त्यांचं योगदान नेहमीच लक्षात राहील’ असं त्यांनी म्हटलंय.

बिहारचे मुख्यमंत्री यांनीही पासवान यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. ‘भारतीय राजकारणात त्यांचं व्यक्तीमत्व खूपच मोठं होतं. ते एक चांगला वक्ता, कुशल प्रशासक आणि उत्तम आयोजक होते. त्यांचं निधन माझ्यासाठी खासगी क्षती आहे’ असं नितीश कुमार यांनी म्हटलंय.

देशानं आपला नेता हरवलाय पण मी माझ्या मोठ्या भावाला मुकलो आहे. माझ्यासाठी हे दु:ख असहनीय आहे. त्यांची कमतरता मला आयुष्यभर सतावत राहील, अशी प्रतिक्रिया बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी व्यक्त केलीय.

‘चिराग पासवान यांना जेव्हा सर्वात जास्त त्यांची गरज होती, तेव्हा पासवान यांचं निधन झालंय. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. मी माझ्या राजकारणातलं पाऊल पासवानजींसोबत टाकलं होतं’ असं आरजेडी नेते यांनी म्हटलंय.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी ‘रामविलास पासवान यांच्या असमय निधानाची बातमी दु:खद आहे. गरिब दलित वर्गानं आज आपला एक कणखर राजनैतिक आवाज गमावलाय. कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना’ असं ट्विट केलंय.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. ‘मी त्यांचा नेहमीच सन्मान केला. त्यांचं निधन केवळ यांचं निधन केवळ तुमचंच नाही तर देशाचं आणि आम्हा सर्वांचंच नुकसान आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी चिराग पासवान यांच्या ट्विटवर व्यक्त केली.

तर, ‘पासवान एक फायरब्रँड नेता होते जे नेहमी गरीबांची चिंता करत होते’ अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केलीय. तर बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी ‘ईश्वर त्यांच्या शांती प्रदान करो, कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. हे बिहारच्या राजकारणातलं मोठं नुकसान आहे’ अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

इतर बातम्या :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here