वाचा:
योगेश प्रदीप महाजन (२६, रा. गंगासागर अपार्टमेंट, शीव कॉलनी), राजेंद्र श्रीराम पाटील (३९, रा. गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा) हे दोघे आपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रत्येक सामन्यावर सट्टा घेत होते. दररोज रात्री दुबई वा शारजात सामना सुरू होताच योगेश याच्या गंगासागर अपार्टमेंटमधील घरात सट्टा घेण्याचा धंदा सुरू होत होता. बुधवारी महेंद्रसिंग धोनीचं नेतृत्व असलेला संघ विरुद्ध शाहरुख खानच्या मालकीचा या दोन संघात सामना सुरू झाल्यानतंरही या दोघांनी नेहमीप्रमाणे सट्टा घेण्यास सुरुवात केली होती.
वाचा:
ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानतंर मॅच सुरू होण्यापूर्वीच रोहोम यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक अंगद नेमाणे, विजयसिंग पाटील, अनिल जाधव, गोरखनाथ पाटील, महेश महाजन, दत्तात्रय बडगुजर, राहुल पाटील, अविनाश देवरे, सविता परदेशी व रमेश जाधव यांचे पथक अपार्टमेंटच्या बाहेर सापळा रचून थांबले होते. योगेशच्या घरात सट्टा घेत असल्याची खात्री होताच पोलिसांच्या पथकाने छापा मारला. यावेळी घरात योगेशसह राजेंद्र देखील आढळून आला. या दोघांकडून टीव्ही, सेटटॉप बॉक्स, रिमोट, पेनड्राइव्ह, लॅपटॉप व १० मोबाइल असा १ लाख २७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोघांच्या विरुद्ध शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times