कोल्हापूर: कोल्हापुरात मला प्रचंड प्रेम मिळाले, लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांशी माझी मैत्री झाली. या ठिकाणी काम करताना जो आनंद मिळाला, तो कुठेच मिळाला नाही. कोल्हापूरकरांनी भरभरून केलेले प्रेम मी कधीच विसरू शकत नाही, असे म्हणत महापालिकेचे आयुक्त डॉ. भावनाविवश झाले आणि त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. ( Latest News Updates )

वाचा:

अठरा महिन्यांपूर्वी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. कलशेट्टी हे रुजू झाले. अठरा महिन्यांत त्यांनी अनेक चांगले उपक्रम राबवले. सलग पंच्याहत्तर रविवार राबवलेली स्वच्छता मोहीम, नालेसफाई, प्लास्टिक मुक्त अभियान, महापूर आणि करोना संसर्गाच्या काळात त्यांनी केलेले काम यामुळे ते कोल्हापुरात चांगलेच लोकप्रिय झाले होते, पण गुरुवारी दुपारी अचानक त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी डॉ. यांची नियुक्ती झाली. सायंकाळी तातडीने बलकवडे यांनी पदभार स्वीकारला. यानंतर पत्रकारांशी बोलताना कलशेट्टी यांना अश्रू आवरले नाहीत.

कलशेट्टी म्हणाले, कोल्हापुरात माझ्यावर सर्वच स्तरातील लोकांनी प्रचंड प्रेम केले. यामुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळाली. कामाचा कधीच मी कंटाळा केला नाही. रात्री बारा वाजले तरी मला नागरिक फोन करत होते. मला फोन केला तर काम नक्की होते, असा विश्वास त्यांना वाटत होता. यामुळे किरकोळ कामासाठी येणारे फोनही मी घेत होतो आणि काम करण्याच्या सूचना देत होतो. यातून कोल्हापूरकर आणि माझ्यात एक वेगळं नातं तयार झालं होतं. हे कोल्हापूरकरांचं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही, असे म्हणताना ते भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

वाचा:

लोकसहभागातून अठरा महिन्यांत जे अनेक उपक्रम राबविण्यात आले त्याचाही आढावा यावेळी त्यांनी घेतला. ते म्हणाले, कोल्हापूरकरांच्यात फार मोठे दातृत्व आहे. आयसोलेशन हॉस्पिटलला देण्यात आलेला जनरेटर, स्मशानभूमीला सात लाख शेणी दान करण्याचा उपक्रम असो वा महापालिकेला अनेक प्रकारची केलेली मदत हे सारे दातृत्व मला काम करण्यास प्रोत्साहन मिळवून देणारे होते.

बलकवडे यांनी स्वीकारला पदभार
कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची गुरुवारी बदली झाली. त्यांच्या जागी डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बलकवडे यांनी गुरुवारी सायंकाळीच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. डॉ. बलकवडे या दोन वर्षे गोंदियाच्या जिल्हाधिकारी होत्या. प्रशासन गतिमान करण्याबरोबरच पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करत कोल्हापूर महापालिका राज्यात आदर्श करण्या्त येईल, अशी प्रतिक्रिया बलकवडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here