राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणणाऱ्या भाजपचे मराठवाड्यातील नेते यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘आमच्या सरकारला तुम्ही अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणताय ते बरोबरच आहे. कारण या तिन्ही नावांमध्ये सर्वधर्मसमभाव आहे आणि तेच मानणारे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, केंद्रातील तुमचे सरकार आंधळे, बहिरे आणि मुके आहे, त्याचे काय?’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यांनी गुरुवारी दानवे यांना टोला लगावला आहे.
दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादीचे तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘देशात वाढलेली बेरोजगारी, उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था दिसत नाही म्हणून आंधळे सरकार. अबला, शोषित पीडित, मागास लोकांवर भाजपशासित राज्यांमध्ये अन्याय अत्याचार होतात. या शोषित लोकांचा आक्रोश ऐकू येत नाही म्हणून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपशासित राज्यातील सरकारे बहिरी आहेत. तसेच या घटनांवर केंद्रातील मंत्री बोलत नाही म्हणून मुके आहे,’ अशी टीका तपासे यांनी केली आहे.
दरम्यान, दानवे यांच्या या टीकेचा गृहमंत्री यांनीही समाचार घेतला होता. ‘दानवेंच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथनी हे बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि करोना संकटातही राज्य प्रगतिपथावर नेतो, कारण होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी,’ असे देशमुख यांचे म्हणणे आहे.
अमर, अकबर, अँथनी या हिंदी चित्रपटाचा संदर्भ देत महाविकास आघाडीचे हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका दानवे यांनी केली होती. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. ते स्वत:च्याच कर्माने पडतील, असे भाकितही दानवे यांनी केलेले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times