म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अत्यावश्यक सेवेतील प्रवासी संख्या वाढत असल्याने जलद मार्गावरील रेल्वे स्थानकांत अतिरिक्त गर्दी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरही लोकल सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. काही जलद लोकलना धीम्या मार्गावरील काही रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेवर धीम्या मार्गावर अत्यावश्यक लोकल सेवा सुरू आहे. मात्र मध्य रेल्वेवर नाहूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, सायन या स्थानकांवर जलद लोकल थांबत नाहीत. या स्थानकांजवळ राहणाऱ्या प्रवाशांना जलद लोकलचा थांबा असलेल्या जवळच्या स्थानकात जावे लागते. यामुळे दोन-तीन स्थानकांतील प्रवाशांचा भार एकाच स्थानकावर येतो. गर्दी वाढल्याने रेल्वे स्थानकांत सुरक्षित वावरच्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे जलद लोकलचाही विचार सुरू आहे.

‘तेजस’ अंधेरीलाही थांबणार

आयआरसीटीसीकडून चालवण्यात येणाऱ्या मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसला अंधेरी स्थानकावर तात्पुरत्या स्वरूपाचा थांबा देण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे. १७ ऑक्टोबरपासून धावणार असून या गाडीचे आरक्षण आज, शुक्रवारपासून खुले होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here