‘केंद्र सरकारने कृषी आणि कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांमुळे देशात शेती आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास पोषक वातावरण आहे,’ असे प्रतिपादन यांनी गुरुवारी केले. शिक्षणाच्या क्षेत्रामध्येही जास्तीत जास्त विद्यापीठांनी देशात गुंतवणूक करावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. जागतिक गुंतवणूक परिषदेत मोदी बोलत होते. भारत आणि कॅनडामध्ये व्यापार विषयक आदान-प्रदान वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये राजकीय स्थैर्य अतिशय आवश्यक असते. देशात सध्या गुंतवणुकीला पोषक असे वातावरण आहे. विविध क्षेत्रांमधील आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देशामध्ये गुंतवणुकीस वाव आहे. खासगी क्षेत्रामध्ये नव्या संधी निर्माण होत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक चांगला भागीदार हवा असेल, तर तो भागीदार म्हणजे भारत आहे. उत्तम प्रतीच्या पायाभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची उत्तम प्रतिमा निर्माण होत आहे.’
मोदी पुढे म्हणाले, ‘करोनाच्या संकटकाळात भारताने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध पॅकेज भारताकडून देण्यात आली. रचनात्मक सुधारणांसाठीही विविध गोष्टी करण्यात आल्या. विविध क्षेत्रातील उत्पादकता वाढण्यास मदतच झाली. दीडशेपेक्षा जास्त देशांना भारताने औषधे पुरवली.’
वाचा :
वाचा :
पंतप्रधान म्हणाले…
– भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे.
– रस्ते, रेल्वेमार्ग, विमानतळे, महामार्ग, ऊर्जास्रोत आदी गोष्टी भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
– विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याची आपल्याला संधी आहे.
– करोनाच्या संकटकाळातही भारतात विविध संधी उपलब्ध होत आहेत.
येल, ऑक्सफर्डचे कॅम्पस भारतात
येल, ऑक्सफर्ड, स्टॅनफोर्ड यांसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस देशात सुरू व्हावेत यासाठी मोदी सरकार कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे वृत्त काही संकेतस्थळांनी दिले. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. देशातील शिक्षण क्षेत्राला बळ देण्यासाठी, विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोखरियाल यांनी म्हटले आहे. लवकरच या कायद्याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times