मुंबईः कुलाब्यातील ज्वेलर्सच्या मालकानं मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या लेखिकेनं दुकानासमोर ठिय्या मांडला होता. गेल्या १८ तासांपासून यांनी दुकानाबाहेर आंदोलन पुकारले आहे. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे. संबंधित ज्वेलर्सच्या मालकानं त्यांची मराठीत माफी मागितली आहे.

शोभा देशपांडे गेल्या १८ तासांपासून दुकानासमोर ठाण मांडून बसल्या होत्या. शोभा देशपांडे यांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेनंतर प्रशासनानं त्यांची दखल घेतली आहे. आज सकाळी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या आंदोलनाला पांठिबा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी ज्वेलर्सच्या मालकाला आंदोलनस्थळी घेऊन आले. त्यानंतर, दुकानदारानं शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली आहे. मात्र, दुकानदारानं माफी मागितल्यानंतरही शोभा देशपाडे यांनी दुकानाचा परवाना दाखवावा या मागणीसाठी वर ठाम होत्या. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत घालून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

महावीर ज्वेलर्स या दुकानातील कर्मचारी हिंदीत संवाद साधत होते. त्यानंतर मराठीत बोला असं शोभा देशपांडे यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला, तसंच, कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याचा आरोप शोभा देशपांडे यांनी केला आहे. दुकानाचा परवाना मागितल्यावर ज्वेलर्सच्या मालकानं अरेरावीची भाषा करत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचं, शोभा देशपांडे यांनी म्हटलं आहे

दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून त्यांनी दुकानासनोर ठिय्या मांडला होता. शोभा देशपांडे यांचे वय ७५ पेक्षा जास्त असून कालपासून त्या अन्नपाण्यावाचून एकाच जागी बसून होत्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here