नवी दिल्ली : २०१८ साली महाराष्ट्राच्या कोरेगाव भीमामध्ये (Bhima-Koregaon Violence) झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) आणखी एका व्यक्तीला अटक केलीय. ८३ वर्षीय () यांना झारखंडमधून अटक करण्यात आलीय. गुरुवारी रात्री उशिरा कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमनं फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. जवळपास २० मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली. आज (शुक्रवारी) स्वामी यांना एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

हाती लागलेल्या माहितीनुसार, फादर स्टेन स्वामी यांना रिमांडवर घेतलं जाऊ शकतं किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणलं जाऊ शकतं. उल्लेखनीय म्हणजे, स्वामींच्या अटकेची माहिती एनआयएकडून पोलिसांनाही देण्यात आलेली नव्हती. स्वामींची या अगोदर २७-३० जुलै आणि ६ ऑगस्टलाही एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांच्या चौकशीनंतर आपल्यावरचे सगळे आरोप स्वामी यांनी फेटाळले होते.

संबंधित बातम्या :

वाचा :

वाचा :

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याच्या कोरेगाव भीमा गावात दलित आणि मराठा समाजामध्ये हिंसाचार उफाळला होता. याच प्रकरणात स्वामी यांना अटक करण्यात आलीय. मूळचे केरळ असणारे आणइ अशी ओळख असलेले फादर स्टॅन स्वामी जवळपास पाच दशकांपासून झारखंडमध्ये आदिवासींसोबत काम करत आहेत. त्यामुळेच स्वामींच्या अटकेचा निषेधही करण्यात येतोय.

‘फादर स्टॅन स्वामी यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलंय. त्यामुळेच मोदी सरकार अशा लोकांना गप्प करण्याच्या माग आहे. कारण या सरकारासाठी कोळसा खाण कंपन्यांचा फायदा आदिवासींचं आयुष्य आणि रोजगाराहून अधिक महत्त्वाचा आहे’ असं इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म्हटलंय. कोरेगाव भीमा प्रकरणात आत्तापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना अटक करण्यात आलीय.

इतर बातम्या :

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here