सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सकल आक्रमक बनला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला आहे. मराठा समाजाचा विरोध डावलून रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत शुक्रवारी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेऊन एमपीएससी परीक्षेला विरोध दर्शवला. राज्य सरकारने तातडीने परीक्षा फुढे ढकलावी, अन्यथा राज्यभर परीक्षा केंद्रे फोडून परीक्षा उधळून लावली जाईल, अशा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
याबाबत माहिती देताना सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विजय देसाई म्हणाले, ‘मराठा समाजाने विरोध दर्शवल्यानंतरही राज्य सरकारने पोलिस भरती प्रक्रिया जाहीर केली. हा प्रकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला उसकवण्याचा आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रविवारी होणारी एमपीएससी परीक्षा स्थगित करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सरकार केवळ चर्चेचे नाटक करीत आहेत. विरोध डावलून परीक्षा घेतल्यास राज्यभरातील परीक्षा केंद्रे फोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास याला राज्य सरकार जबाबदार असेल.’ बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिका-यांसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times