एका भारतीय फूड डिलीव्हरी कंपनीने ट्विटरवर साधा प्रश्न विचारला होता. अशी कोणती डिश आहे की तुम्हाला समजत नाही की लोकांना का आवडते, असा साधा प्रश्न विचारला होता. त्याला रिट्विट करून उत्तर देताना ब्रिटीश प्राध्यापक एडवर्ड अँडरसन यांनी इडलीला जगातील सर्वात बोरिंग पदार्थ असल्याचे म्हटले. त्यांच्या उत्तरावर भारतीय खाद्यप्रेमी तुटून पडले. इडलीच्या समर्थनासाठी सर्व भारतीय एकजूट झाले.
वाचा:
काहींनी एडवर्ड यांना मुर्ख गोरा माणूस म्हटले. तर, काहींनी इडलीमुळे संपूर्ण दक्षिण भारत एकवटला असल्याचे म्हटले. काँग्रेस नेते शशी थरूर यांचा मुलगा ईशान थरूर याने आतापर्यंत ऐकलेले सर्वात आक्षेपार्ह पदार्थ असल्याचे म्हटले. शशी थरूर यांनीही या वादात उडी घेतली. जीवन काय असते, हे समजू न शकणाऱ्या माणसावर दया करा, असे ट्विट थरूर यांनी केले.
वाचा:
वाचा:
एडवर्ड अँडरसन यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, संपूर्ण दक्षिण भारताने माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी, मी फक्त इतकेच म्हणू शकतो की मला डोसा आणि अप्पम आणि मुळात सर्व दक्षिण भारतीय खाद्य आवडतात. परंतु इडली मुळीच आवडत नाही. इडलीवरून सुरू असलेली टीका लक्षात घेता अँडरसन यांनी आपण दुपारच्या जेवणात इडली खाणार असल्याचे ट्विट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times