नगर: ‘महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या आधी मी संपर्कप्रमुख यांना जाऊन भेटलो. मात्र, या भेटीमध्ये स्थायी समिती सभापती निवडीची चर्चा झाली नाही. या भेटीत मी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करू असे म्हटल्याचे साफ खोटे आहे,’ असे स्पष्टीकरण भाजपचे महापौर यांनी दिले आहे. ( Rejects ‘s Claim )

वाचा:

नगरच्या शिवसेनेत असणाऱ्या गटातटांचे मनोमिलन करण्यासाठी गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी शिवसैनिकांसमोर स्थायी समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी सांगत एक गौप्यस्फोट केला होता. ते म्हणाले होते, ‘स्थायी समिती सभापती निवडीच्या आदल्या रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान महापौर बाबासाहेब वाकळे मला भेटले होते, त्यांनी मला विचारले तुमचा फॉर्म ठेवणार का नाही? त्यावर मी म्हणालो, ते वरती ठरेल. त्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही फॉर्म ठेवा, आम्ही मतदान करू. पण मी त्यांना स्पष्ट सांगितले, जे आमच्या पक्षात वरून ठरते ते आम्ही करतो ‘जय महाराष्ट्र’. कोरगावकर यांच्या वक्तव्यानंतर मात्र नगर महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवीन खेळी करण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

वाचा:

याबाबत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘भाऊ कोरगावकर हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते असे बोलणार नाहीत असे वाटतं. पण मी त्यांना मतदान करू असे सांगितले, हे साफ खोटे आहे. मी त्यांना भेटलो, पण त्या भेटीला ‘स्थायी’चे कारण अजिबात नव्हते. आमची भेट अनौपचारिक होती.’ परंतु यानिमित्ताने आता कोरगावकर व वाकळे यांची भेट नेमकी कशासाठी झाली?, स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या आदल्या दिवशी नेमकी का अनौपचारिक भेट घ्यावी लागली?, असे प्रश्नही निर्माण झाले असून आगामी काळात त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

वाचा:

सभापती भाजपचेच आहेत

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाची निवड झाली. या निवडणुकीत सभापतीपदी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांना संधी मिळाली. त्यानंतर मात्र भाजपने कोतकर यांना खुलासा करण्याबाबत नोटीस पाठवली होती. तसेच समाधानकारक खुलासा नसल्यास कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. याबाबत महापौर बाबासाहेब वाकळे यांना विचारले असता, ‘स्थायीचे सभापती हे भाजपचेच आहेत, मध्येच आहेत,’ असे सांगत त्यांनी अधीक बोलणे टाळले. तर, काल पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी स्थायीचे सभापती महाविकास आघाडीचे असल्याचे सांगितले होते. मात्र, आज पुन्हा वाकळे यांनी स्थायीचे सभापती भाजपचे आहेत, असे स्पष्ट केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here