वाचा-
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या निमलष्करी दलाने या मुलींना प्रशिक्षण दिले आहे. चार वर्षांपासून या मुली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकीचे धडे गिरवत आहेत. कोंडागाव जिल्ह्यात माओवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी या दलाला इथे तैनात करण्यात आले आहे.
वाचा-
या दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की या मुलींना २०१६मध्ये हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. आता हॉकी खेळण्याबरोबरच त्या छत्तीसगढ जिल्ह्यातील मर्दापालमधील कन्या आश्रमात राहून शिक्षणही घेत आहेत. या मुलींचे मार्गदर्शक सूर्या स्मित यांनी म्हटले आहे, ‘जर या मुलींना आणखी खेळण्याची संधी मिळाली तर त्या कमाल करून दाखवू शकतात. आम्ही त्यांना हॉकीसाठी आवश्यक अशी मूलभूत क्रीडासामुग्री देतो तसेच गणवेशही उपलब्ध करून देतो. या मुली हळूहळू आपली क्षमता वाढवत आहेत.’
मात्र या मुलींना हॉकीसाठी आवश्यक ते मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
या खेळाडूंपैकी एक सुलोचना नेताम म्हणते, ‘आम्हाला हॉकीबद्दल २०१६पर्यंत माहीतच नव्हते. मात्र निमलष्करी दलाने आम्हाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली तेव्हा या खेळाबद्दल माहिती झाली. आता आम्ही मर्दापाल पोलिस शिबिराजवळच्या हेलिपॅडवर सराव करतो आहोत. तीच एक मोकळी जागा आमच्यासाठी उपलब्ध आहे.’
नेताम सांगते, ‘हेलिपॅडची जागा ही सिमेंटची बनलेली आहे. शिवाय, ती खडबडीतही आहे. त्यामुळे दुखापत होण्याचा धोका असतो. तसेच इथे खेळणेही कठीण असते. त्यामुळे आम्हाला योग्य पृष्ठभागावर खेळता यावे अशी मागणी आम्ही क्रीडा मंत्र्यांकडे केली आहे.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times