वाचा-
गेलला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संधी मिळेल, असे पंजाबचे फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर यांनी सांगितले होते. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गेलला संधी दिली नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पंजाबचा संघ गेलला अजूनही संधी का देत नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पण या प्रश्नाचे उत्तर आता कुंबळे यांनी दिल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा-
याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले की, ” सनराझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आम्ही ख्रिस गेलला खेळवण्याचे ठेरवले होते. पण तो गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहे. गेलने चुकीचा आहार घेतल्यामुळे तो आजारी पडला आहे. त्यामुळे गेलला आम्ही हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संघात स्थान देऊ शकलो नाही.”
आतापर्यंत पंजाबचा संघ सहा सामने खेळला आहे आणि त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे अजूनही पंजाबचा संघ गेलला का खेळवत नाही, असा प्रश्न चाहत्यांपुढे होता. पण गेल जर आजारी असेल तर त्याला कसे खेळवता येईल, ही गोष्ट चाहत्यांना पटलेली आहे. त्यामुळे गेलने लवकर फिट व्हावं आणि मैदानामध्ये परतावं, अशीच अपेक्षा चाहते करत असतील.
वाचा-
सध्याच्या घडीला पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. कारण आतापर्यंत आयपीएलमधील सर्वाधिक धावा लोकेश राहुलच्या नावावर आहेत. त्याचबरोबर मयांक अगरवालनेही या आयपीएलमध्ये शतक झळकावलेले आहे. त्यामुळे गेलला संधी दिली तर त्याला कोणत्या स्थानावर खेळवायचे, हा देखील पंजाबपुढे प्रश्न असेल. गेल संघात आला तर त्याला सलामीला पाठवावे लागेल. पण त्याच्याबरोबर राहुल सलामीला येणार की मयांक, हा मोठा प्रश्न पंजाबच्या संघाला सोडवावा लागणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times