अरावली:
आपले केस लांबसडक असावेत, असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. म्हणूनच सर्वात लांब केस असणारी मुलगी म्हणून गुजरातची चर्चेत असते. २०१८ मध्ये आपल्या लांबसडक केसांसाठी तिच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. आता तिचे केस सहा फुटांपेक्षाही जास्त लांब वाढले आहेत. तिचं वय अवघं १७ वर्षं आहे.

२०१८ मध्ये नीलांशीची गिनीज बुकात नोंद झाली होती. तेव्हा तिचे केस १७०.५ सें.मी. लांब होते. आता तिचे केस १९० सें.मी. पर्यंत म्हणजेच ६.२३ फुटांपर्यंत वाढले आहेत! ती म्हणते, ‘जेव्हा मी सहा वर्षांची होते, तेव्हा एका ब्युटिशिअनने माझे केस खूपच तोकडे केले होते. त्यानंतर मी केसांना कातर लावली नाही. माझ्या कुटुंबानेही माझा निर्णय मान्य केला. आता मला ती घटना माझ्यासाठी लकी वाटते.’

नीलांशी पटेल म्हणते, ‘मी कुठेही गेले तरी लोकांना माझ्यासोबत सेल्फी घ्यायचा असतो. मला एकदम सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतं.’ नीलांशीने गिनीज बुकातला आपलाच विक्रम मोडला आहे. नीलांशीची आई म्हणते, ‘या केसांसाठी खूप मेहनत करावी लागते. लांब केस हे नीलांशीला तिच्या आईवडिलांच्या जीन्समुळे मिळाले आहेत. तिच्या केसांना आम्ही जास्त कॉस्मेटिक वगैरेचा देखील वापर करत नाही. ती आठवड्यातून केवळ एकदा केस धुते आणि चांगल्या पद्धतीने तेल लावते.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here