शारजा, : शारजाच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, असे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. पण राजस्थान रॉयल्सच्या अचूक गोलंदाजीपुढ दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज अपयशी ठरलेले पाहायला मिळाले. जोफ्रा आर्चरने दिल्लीला सुरुवातीला दोन धक्के दिले. त्याचबरोबर दिल्लीचे दोन फलंदाज धावचीत झाले. त्यामुळे दिल्लीच्या संघाला यावेळी राजस्थानपुढे मोठे आव्हान ठेवता आले नाही. दिल्लीने यावेळी राजस्थानला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले आहे.

राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या संघाला यावेळी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण त्यांचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. शिखर धवनला यावेळी पाच धावा करता आल्या, तर पृथ्वी साव १९ धावांवर बाद झाला. रिषभ पंतने तर यावेळी धावचीत होत आत्मघात केला, त्याला पाच धावा करता आल्या.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर यावेळी मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते. पण राजस्थानच्या यशस्वी जैस्वालने यावेळी भन्नाट कामगिरी केली आणि श्रेयसला धावचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. श्रेयसला यावेळी२२ धावांवर समाधान मानावे लागले. मार्कस स्टॉइनिस आणि शइमरॉन हेटमायरल ही जोडी दिल्लीला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाचत होते. पण मार्कसला राहुल टेवाटियाने कर्णधार स्टीव्हन स्मिथकरवी झेल बाद केले आणि ही जोडी फोडली. मार्कसला यावेळी ३९ धावा करता आल्या.

मार्कस आऊट झाल्यावर हेटमायरल दिल्लीचा धावफलत हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावता होता. दिल्लीच्या संघाकडून यावेळी सर्वाधिक धावा या हेटमायरनेच केल्या. हेटमायरने २४ चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांसह ४५ धावांची खेळी साकारली. आर्चरने या सामन्यात भेदक मारा करत तीन बळी मिळवले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here