हाथरस: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या () यांनी आज उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस बलात्कार प्रकरण आणि हत्या प्रकरणातील (Hathras gangrape and murder case) पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हासरथला पोहोचल्या. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर मेधा पाटकर यांनी (Yogi Government) आणि पोलिस प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले आहेत.

पीडितचे कुटुंबीय आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत खोटी वक्तव्ये करणार नाही, असे मेधा पाटकर म्हणाले. पीडितेच्या कुटुंबीयांना आजपर्यंत शवविच्छेदन अहवाल का दिला गेला नाही?, पीडितेला दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) घेऊन जाण्याऐवजी सफदरजंग रुग्णालयात का नेले गेले?, असे प्रश्न मेधा पाटकर यांनी विचारले आहेत.

मेधा पाटकर यांनी वैद्यकीय तपासणीवर देखील उत्तर प्रदेश सरकारला घेरले आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले. जिल्हाधिकाऱ्यांचे जे कर्तव्य आहे ते पूर्ण केले गेले पाहिजे होते, सरकारची देखील नैतिक जबाबदारी असते असेही मेधा पाटकर म्हणाल्या.

तर दुसरीकडे उत्तर प्रदेशते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाबाबत विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. जातींच्या आणि धर्माच्या नावाने समाजात फूट पाडणाऱ्या लोकांना जनता पोटनिवडणुकीत उत्तर देईल, असे निवडणुकीचे बिगूल वाजवत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. हा नवा उत्तर प्रदेश असून, या राज्यात गुन्हेगारांना स्थान नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री योगी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांच्यासोबत शुक्रवारी जौनपूर जिल्ह्यातील मल्हंनी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

ज्यांच्या विचारांमध्येच विकास नाही, ज्यांचे विचार जात, धर्म आणि क्षेत्रापर्यंतच मर्यादित आहेत, जे आपला पक्ष कुटुंबाप्रमाणे चालवत आहेत अराजकता आणि भ्रष्टाचार ज्यांची ओळख आहे आणि ज्यांच्या काळात विकासाची ९० टक्के रक्कम खाल्ली जात असेल, अशा लोकांवर भेदभावविरहीत आणि पूर्णपणे पारदर्शकतेसह होत असलेल्या विकासाची कामे आणि गरीबांचा विकास आवडत नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ते समाजात जात आणि धर्माच्या नावावर फूट पाडण्याच्या जुन्याच चालींचा वापर करत आहेत. अशा लोकांचे आता काहीच चालणार नाही. जनता सर्व जाणते आणि सतत त्यांना धडेही शिकवत आहे. हे पाटनिवडणुकीत दिसून येईल, असेही योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here