वाचा:
राज्यातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यात करोना मृत्यूंचे प्रमाण अजूनही चिंताजनकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज आणखी ३०२ मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील सध्या २.६४ टक्के इतका आहे. आज सर्वाधिक ४७ मृत्यूंची नोंद महापालिका हद्दीत करण्यात आली तर सातारा जिल्ह्यात २२ करोना बाधितांचा मृत्यू झाला.
वाचा:
आज १७ हजारावर रुग्ण झाले करोनामुक्त
राज्यात आज १२ हजार १३४ नवीन रुग्णांची नोंद झाली तर १७ हजार ३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण १२ लाख २९ हजार ३६९ रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.६३ टक्के झालं आहे. राज्यात आतापर्यंत ७४ लाख ८७ हजार ३८३ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १५ लाख ६ हजार १८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २३ लाख ५८८ जण होम क्वारंटाइन आहेत तर २४ हजार ९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
जिल्ह्यात आज १७४७ नवीन रुग्ण
ठाणे जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची वाढ कायम असून आज १७४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा १ लाख ८९ हजार ६१ झाला आहे. तर १ लाख ६७ हजार ७११ रुग्ण बरे झाले असून सध्या १६ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच दिवसभरात जिल्ह्यात ४४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा वाढत ४ हजार ७७७ वर पोहचला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times