पुणे: केडरचे व मूळचे येथील आयएएस अधिकारी यांचे आज पुण्यात निधन झाले. अवघे ३४ वर्षे वय असलेले शिंदे हे नुकतेच त्रिपुराहून नांदेड येथे आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर नांदेड तसेच औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्यात आणले गेले होते. सदृष्य लक्षणे असल्याने त्यांची दोन वेळा चाचणी करण्यात आली होती मात्र दोन्ही वेळा अहवाल निगेटिव्ह आले होते.
सुधाकर शिंदे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे उपचारांदरम्यान आज त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शिंदे यांना करोना सदृष्य लक्षणे असल्याने त्यानुसार उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यांची आरटीपीसीआर चाचणी दोन वेळा निगेटिव्ह आली होती, असे सांगण्यात आले.
दरम्यान, प्रशासनाने शिंदे यांच्या मृतदेहावर पुण्यातच अत्यसंस्कार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार त्यांचे नातेवाईक हे रात्रीच पुण्यात दाखल होतील आणि त्यानंतर उद्या शनिवारी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times