फक्त नळीत फुंकर मारायची; करोना झाला आहे की नाही एका मिनिटात समनवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्ते हे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होते आणि त्यांच्या खांद्यावर सरकारच्या विरोधात बुद्धिजीवींना एकजूट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेकने (एनआयए) केला आहे. एनआयएने शुक्रवारी भीमा-कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रात हा दावा केला आहे.

आरोपपत्रात अनेक गंभीर आरोप

दिल्ली विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर हनी बाबू हे नक्षली क्षेत्रात विदेशी मीडियाच्या भेटी आयोजित करण्यात मदत करत होते आणि त्यांना आंध्र प्रदेश आणि तेलंगणात प्रतिबंधित दहशतवादी संघटना रिव्होल्यूशनरी डेमोक्रॅटि फ्रंटच्या (आरडीएफ) कामांची जबाबदारी सोपविण्यात आली होती असा दावा एनआयएने केला आहे.

यांच्या विरोधात दाखल केले आरोपपत्र
एनआयएने गौतम नवलखा, हनी बाबू, आनंद तेलतुंबडे, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, मिलिंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी या आठ आरोपींविरोधात मुंबईतील एका विशेष एनआयए कोर्टात पुरक आरोपपत्र दाखल केले.

भीमा कोरेगाल प्रकरणी गौतम नवलखा यांची भूमिका आणि भागीदारी असल्याचे एनआयएने म्हटले आहे. नवलखा याचा माओवादी कॅडरसोबत भेटीगाठी होत होत्या असा दावाही एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

एनआयएने केली होती अटक

हनी बाबू प्रतिबंधित दहशतवादी संघटना मणिपूरच्या कुंगलपाक कंगलेपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (केसीपी) संपर्कात होता आणि जी. एन. साईबाबाच्या निर्देशांनुसार चालत होता, तसेच त्याच्यासाठी निधी देखील गोळा करत होता असा दावा एनआएने केला आहे. एनआयएने या वर्षी २८ जुलैला बाबूला नोएडा येथील त्याच्या निवासस्थानाहून अटक केली होती. तर, नवलखा यांना १४ एप्रिल या दिवशी आनंद तेलतुंबडे यांच्यासह अटक केली होती.

क्लिक करा आणि वाचा-

माओवादी विचारधारेचा प्रचार करण्याचा आरोप

आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, गोरखे, गायचोर जगताप आणि स्वामी यांनी इतर आरोपी व्यक्तींसोबत माओवादी विचारधारेचा प्रचार केला आणि कायद्याद्वारे स्थापित झालेल्या सरकारविरोधात असहमती निर्माण करून विविध समूहांमध्ये धर्म, जात आणि समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण केले, असे आरोप आरोपत्रात करण्यात आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here