श्रीनगरः केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठी सुरू केलेल्या योजना सांगण्यासाठी तसेच कलम ३७० हटवण्याचे फायदे सांगण्यासाठी केंद्र सरकारमधील ३६ मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील जनतेशी संवाद साधून त्यांना या योजनेची माहिती सांगणार आहेत. केंद्र सरकारमधील ३६ मंत्री हे १८ जानेवारीपासून हा दौरा सुरू करणार असून यात केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, जितेंद्र सिंह, अनुराग ठाकूर यांच्यासह ३६ मंत्री या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी रोजी हा दौरा निश्चित होणार आहे. १८ जानेवारीपासून हा दौरा सुरू होणार असल्याचे केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा हा पहिला दौरा आहे. तसेच केंद्र शासित राज्य बनवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांना सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री हा दौरा करीत आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी राज्य सरकारचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांना पत्र पाठवून या दौऱ्यासंबंधी माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्र्यांचे ५१ दौरे असणार आहेत. यात जम्मू विभाग आणि ८ काश्मीरमध्ये दौरा असणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी १९ जानेवारी रोजी कटडा आणि रियासी परिसराला भेट देणार आहेत. याच दिवशी रेल्वेमंत्री पीयूष गोयल श्रीगरचा दौरा करणार आहेत. त्यानंतर २० जानेवारी रोजी जनरल व्ही. के. सिंह उधमपूरला जाणार आहेत. २१ जानेवारी रोजी किरेन रिजिजू जम्मू-काश्मीरच्या सीमांत परिसरातील सुचेतागढला जाणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, रमेश पोखरियाल निशंक, जितेंद्र सिंह सह अन्य काही केंद्रीय मंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. २२ जानेवारी रोजी गृह राज्य मंत्री जी. किशन रेड्डी गांदरबल आणि २३ जानेवारी रोजी मनीगामचा दौरा करणार आहेत. त्यानंतर २४ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद बारामुलाच्या सोपोरचा दौरा करणार आहेत. केंद्रीय मंत्री आर के सिंह डोडा आणि संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाइक श्रीनगरचा दौरा करणार आहेत. मंत्र्यांच्या दौऱ्याचा अंतिम निर्णय १७ जानेवारी रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here