कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रातील , सांगली व जिल्ह्यात करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे आजपर्यंत झालेल्या सर्व बाधित मृत्यूंचे ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

वाचा:

मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, करोनामुळे या तीन जिल्ह्यांत गेल्या सहा महिन्यात चार हजारांवर रुग्णांचे बळी गेले. हा आकडा मोठा असल्याने त्याचे ऑडिट करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. याला मान्यता मिळाल्याने तातडीने याचे ऑडिट सुरू करण्यात येईल. रुग्णांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी काय उपचार केले? डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला का? रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी पडल्याने मृत्यू झाला की आरोग्य यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे याचा शोध घेतला जाणार आहे. काही डॉक्टरांनी या काळात रुग्णांची लूट केल्याच्या तक्रारी आहेत. माणुसकी सोडून केलेल्या लुटीचा डॉक्टरांना हिशेब द्यावा लागेल, असेही मुश्रीफ यांनी बजावले.

वाचा:

राज्यात करोना बाधितांची संख्या सध्या कमी होत असली तरी, येत्या काही दिवसांत पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. , दिवाळी, दसरा यामुळे लोकांची गर्दी वाढेल. हॉटेल, लोकल रेल्वे सुरू होणार असल्याने करोनावाढीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्याचे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, रुग्णांना औषधे कमी पडू नयेत, याचीही व्यवस्था केली आहे.

वाचा:

येत्या १५ ऑक्टोबरपासून साखर हंगाम सुरू करण्यास परवाने दिल्याचे स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले, १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसाचा अंदाज आहे. यामुळे गळीत हंगाम थोडा पुढे जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत साखर कारखान्यांवर आलेल्या ऊस तोडणी मजुरांना करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने योग्य दक्षता घेतली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here