पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा चार चाकी वाहनाचे उद्घाटन विधान भवन येथे अजित पवारांच्या उपस्थित झाले. त्यावेळी माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यानं मास्क खाली घेतला होता. ते बघून, ए मास्क वर घेऊन बोल, असा त्याला दम भरला.
देशात आणि राज्यात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर यांनी सुरुवातीपासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्हज घालतानाच त्यांनी लोकांशी हस्तांदोलन करणंही बंद केलं आहे. तसेच कार्यकर्त्यांना कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी न करण्याच्या कडक सूचनाही दिल्या आहे. ते ज्या कार्यक्रमाला जातात तिथे मोजकीच उपस्थिती असते. शिवाय ते ठिकाणही सॅनिटाइज केलं जातं. तसेच स्टेजवरील खुर्च्यांमध्येही अंतर ठेवलेलं असतं.
दरम्यान, करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी करोनाला हद्दपार करण्यासाठी सरकार, प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी करोना प्रतिबंधक उपाययोजना सुचविल्यास प्रशासनाने त्या सूचनांची अंमलबजावणी करावी,’ असे आदेश अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. ‘रुग्णालयांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times