नवी दिल्लीः वादग्रस्त वक्तव्य करून सतत चर्चेत राहणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी पुन्हा एकदा एक अजब विधान केले आहे. भारताची आर्थिक स्थिती गेल्या काही दिवसापासून ढासळली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची जी घसरण सुरू आहे. ती रोखण्यासाठी तसेच भारतीय रुपयांना मजबूत करायचे असेल तर भारतीय लावण्यात यावा, असे केल्यास भारतीय रुपया मजबूत होईल, असा अजब सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते. इंडोनेशियात नोटांवर गणपती यांचा फोटो आहे, या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात. गणपती नोटावर असल्याने अनेक संकट दूर करतात. त्यामुळे मला वाटते की, भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी यांचा फोटो असायला हवा. जर भारतीय नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावला तर भारतीय रुपया मजबूत होईल. यावर कोणाचीही वाकडी नजर पडणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. नागरिकत्व संशोधन कायद्यासंदर्भात बोलताना स्वामी म्हणाले की, काँग्रेस आणि महात्मा गांधींनी याचे समर्थन केले होते. मनमोहन सिंग यांनी २००३ साली संसदेत याविषयी निवेदन दिले होते, असे स्वामी म्हणाले.

काँग्रेस बोलत आहे की, पाकिस्तानच्या मुस्लिमांसोबत अन्याय झाला आहे. काय अन्याय झाला आहे. पाकिस्तानचे मुस्लिम येवू शकत नाही आणि आम्ही त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही, असे स्वामी म्हणाले. मुस्लिम आणि हिंदुंचा डीएनए एकसमान आहे. ब्राह्मण आणि दलित ज्याप्रमाणे एकसमान आहे. त्याचप्रमाणे हिंदू-मुस्लिम एक आहेत, असेही स्वामी म्हणाले. भाजप लवकरच युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणार असल्याचा दावाही सुब्रमण्यम स्वामी यांनी यावेळी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here