‘मोदी सरकारच्या काळात देशाची आर्थिक स्थिती विदारक बनत चालली असून हाथरस सारख्या घटनेवरून दलित आणि महिलांवर वाढत चाललेले अत्याचार देशाची चिंता वाढवणारे आहेत,असे शिंदे यांनी सांगितले. सुशांत प्रकरणात सोशल मिडीयातून काही फेक अकाऊंट बनवून मुंबई पोलीसांची बदनामी केली. सोशल मिडीयाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला होता याची आठवण सांगताना ‘मी न बोललेल्या वक्तव्याची मला माफी मागावी लागल्याचे,’ शिंदे यांनी सांगितले.
सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने होणे आवश्यक असल्याचे मतही शिंदे यांनी व्यक्त केले. सध्या सुरु असलेल्या आरक्षण प्रश्नावर बोलताना काही मंडळी भडक विधाने करून समाजात फूट पडत असले तरी मराठा समाजाला आरक्षणास आपला पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाजप नेते राज्यात सत्तेत येणार असल्याची वक्तव्य करीत असल्याकडे लक्ष वेधले असता भाजपावाल्याना स्वप्ने बघण्याची सवय आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times