म. टा. प्रतिनिधी, मुंबई

झोपडपट्टी पुर्नविकास धोरणानुसार पात्र झोपडपट्टीधारकांना मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौरस फुटापर्यंत वाढविण्यात यावे, अशी मागणी वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

शेख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटून यासंबंधीचे निवेदन दिले आहे. झोपडपट्टीतील रहिवाश्यांना सध्या पुनर्विकासात देण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ अपुरे पडते. पाच व्यक्तीचे कुटुंब असेल तर जागेची अडचण निर्माण होते. त्यामुळे ‘एसआरए’ योजनेनुसार पात्र झोपडपट्टीधारकांना देण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ. फूट केल्यास त्यांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

झोपडपट्टीधारकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना हक्काचे मोठे घर मिळावे, यासाठी तातडीने मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ. फूट करण्याचा निर्णय घ्यावा, असेही शेख यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here