: केंद्रीय मंत्री यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात अंत्यसंस्कार पार पडत आहेत. मुलगा यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्याअगोदरच्या विधी पूर्ण केल्या आहेत. दीघा घाटावर आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी करोनाकाळातही हजारोंच्या संख्येनं समर्थन गोळा झालेले दिसले.

चिराग पासवान यांच्यासोबत त्यांची आईही दीघा घाटावर उपस्थित आहे. रामविलास पासवान हे मूळचे बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील शराबान्नी गावचे रहिवासी होते. १९६० मध्ये राजकुमारी देवी यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. राजकुमारी देवी आणि रामविलास पासवान या जोडप्याला उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र, या दोघांनी १९८१ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर पासवान यांनी १९८३ मध्ये रीना शर्मा यांच्याशी विवाह केला. रीना – रामविलास पासवान या दाम्पत्याला एक मुलगी आणि मुलगा चिराग पासवान ही दोन मुले आहेत.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर पार पडले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेदेखील दीघा घाटावर पोहचले. त्यांनीही पासवान यांना श्रद्धांजली अर्पण केली.

रामविलास पासवान यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुशील मोदी तसंच आरजेडी नेते तेजस्वी यादव हेदेखील उपस्थित होते.

वाचा :

वाचा :

दीर्घ आजारपणानंतर गुरुवारी सायंकाळी रामविलास पासवान यांचं दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झालं होतं. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजल्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव दिल्लीहून पाटण्याला दाखल झालं होतं. विमानतळावरही रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी पासवान यांचं पार्थिव पाटणा स्थित लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात आलं होतं.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here