मुंबई- लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसचा १४ वा सीझर सुरू झाला आहे. सलमान खान होस्ट असलेला हा शो आधीच्या सीझनपेक्षा अधिक रंजक असेल असं आता वाटू लागलं आहे. यी सीझनची थीम आहे ‘अब पलटेगा सीन, क्युन्की बिग बॉस डेगा 2020 को जवाब.’ त्यामुळेच अनेक ट्वीस्ट आणि टर्न या शोमध्ये पाहायला मिळतील अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. या शोमध्ये अभिनव शुक्ला, एजाज खान, राहुल वैद्य, पवित्र पुनिया, जास्मीन भसीन, निक्की तांबोळी, शहजाद देओल, जान कुमार सानू, रुबीना दिलैक, निशांतसिंग मलकानी आणि सारा गुरपाल हे सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून एकमेकांशी भिडत आहेत.

या शोमध्ये पहिले दोन आठवडे ‘तुफानी सीनिअर्स’ अर्थात सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान यांना फ्रेशर्स (नवीन स्पर्धक) चा खेळ बदलण्याची खास सूट देण्यात आली आहे. सिद्धार्थचं बेडरूमवर अधिराज्य आहे. त्याच्या परवानगीनेच स्पर्धकांना बेड वापरायला मिळणार आहे. हिना खान ही स्पर्धकांच्या खासगी वस्तूंची मालकिण असणार आहे. कोणत्या स्पर्धकांना किती सामान द्यायचं हे तीच ठरवणार आहे. तर गौहर खान स्वयंपाक घरची राणी आहे. स्पर्धकांना जेवायला मिळेल की नाही ते तिच्या हातात आहे.

असं असलं तरी निक्की तंबोली, पवित्र पुनिया, शहजाद देओल आणि अभिनव शुक्ला यांच्यासह काहींनी या शोमध्ये पुढे जाण्यास ते सक्षम असल्याचं दाखवून दिलं आहे. ते घरातल्या कॅमेऱ्यांचं जास्तीत जास्त लक्ष वेधून घेत आहेत. आता येणाऱ्या काळात ते कसे राहतात ते पाहणं रंजक असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here