वाचा:
पैसे देऊन टीआरपी वाढविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ‘फक्त मराठी’, ” या दोन चॅनेल्सचे मालक शिरीष सतीश पट्टानशेट्टी आणि नारायण नंदकिशोर शर्मा, हंसा कंपनीचा माजी कर्मचारी विशाल भंडारी याच्यासह बॉम्बपल्ल्याराव नारायण मिस्त्री याला अटक केली. सहायक आयुक्त शशांक सांडभोर, सी. आय. यु चे यांचे पथक या आरोपींची कसून चौकशी करीत असून चौकशीत ज्यांची नावे समोर येत आहेत त्यांना समन्स बजावण्यात येत आहेत. शनिवारी लिंटास आणि मेडिसन या जाहिरात एजन्सीचे शशी सिन्हा आणि मेडिसनचे सॅम बलसारा यांची आठ तास चौकशी करण्यात आली. आपल्या एजन्सीकडून किती चॅनेल्सना गेल्या दोन वर्षात जाहिराती देण्यात आल्या. कोणत्या आधारावर जाहिरात दिल्या आणि किती दर आकारण्यात आले याची माहिती या प्रतिनीधींकडून घेण्यात आली. तसेच या प्रतिनींधीच्या संपर्कात चॅनेल्समार्फत नेमके कोण होते? याबाबतची माहीतीही घेण्यात आली. याशिवाय विशाल भंडारी याच्याकडे असलेल्या ८३ बॅरोमीटर्स पैकी ३८ कुटुंबांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
वाचा:
जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींची चौकशी करतानाच मुंबई पोलिसांनी आज आणखी सहा जणांना समन्स जारी केले. रिपब्लिक नेटवर्कचे सीईओ विकास खानचंदानी, मुख्य ऑपरेटर अधिकारी हर्ष भंडारी, प्रिया मुखर्जी, वितरण विभागप्रमुख घनःश्याम सिंग यांच्यासह हंसा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात आमच्या अर्जावर आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रिपब्लिकचे सीएफओ शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times