शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील ‘महागाईची संक्रांत’ या अग्रलेखात केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
‘निदान बरे दिन होते ते तरी आणा’
महागाईच्या मुद्द्यावरून अग्रलेखात भारतीय जनता पक्षाच्या ‘अच्छे दिन’ या संकल्पनेची खिल्लीही उडवण्यात आली आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील, पण आटोक्यात आणून निदान जे काही बरे दिन होते ते तरी सामान्य माणसाच्या जीवनात आणा, असा टीका वजा सल्ला अग्रलेखाद्वारे देण्यात आला आहे.
नागरिकता सुधारणा कायदा, एनआरसी अशा गोष्टी आणि त्यावरून उठलेले वादळ सुरूच राहणार आहे, मात्र सामान्य माणसाला सोसाव्या लागणाऱ्या महागाईच्या झळांचे काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. सरकारने इतर कामाचे ढोल पिटण्यापेक्षा महागाईच्या झळा कशा कमी होतील याकडे लक्ष द्यायला हवे, अन्यथा महागाईची संक्रांत आपल्यावर उलटू शकते, याचे भान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले बरे असा इशाराही देण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times