वॉशिंग्टन: करोनाविरोधातील लढाईत अमेरिकेला भारताने मदतीचा हात दिला आहे. भारताने १.८ दशलक्ष एन९५ मास्क पेनसिल्व्हेनिया राज्यातील सर्वात मोठे शहर फिलाडेल्फियाला दिले आहे. कोविड १९ विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने हा सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात अशी भरीव मदत करत भारत-अमेरिका मैत्री संबंध अधिक दृढ करण्यास मदत केली आहे.

फिलाडेल्फियाचे महापौर जिम केन्ने यांनी, भारताला मास्क पुरवण्याची विनंती केली होती. हे मास्क साथीच्या आजाराचा सामना करणासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वापरला जाणार आहेत. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी शुक्रवारी ट्विट करून हे मास्क मिळाल्याची माहिती दिली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील भारत आणि अमेरिका यांच्यात विश्वासार्ह भागीदारीचे हे आणखी एक उदाहरण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वाचा:

वाचा:

या उदाहरणावरून वैयक्तिक संरक्षण उपकरण (पीपीई) तयार करण्यात भारत सक्षम असल्याचे दिसून येते. याशिवाय केवळ देशांतर्गत वापरासाठीच नव्हे तर निर्यातीसाठीही पीपीई करण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे, असेही मत या निमित्ताने अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

वाचा:

अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ८० लाखांच्या घरात पोहचली आहे. त्यापैकी दोन लाख १९ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५० लाख ८९ हजारजणांनी करोनावर मात केली आहे. तर, दुसरीकडे करोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील तीन लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यापैकी फायजर ही लस डिसेंबर महिन्यात येणार असल्याची चर्चा आहे.

वाचा:

दरम्यान, जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाच्या संसर्गाची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत झाली असल्याचा आरोप अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. करोनामुळे जगभरातील जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे चीनविरोधातही रोष निर्माण झाला होता. चीनमधून
झाली का, याची तपासणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक तज्ज्ञांची समिती नेमली आहे. मात्र, या समितीतील नावांच्या मंजुरीसाठी ही नावे चीनला पाठवण्यात आली आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here