या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवरियामध्ये पोटनिवडणुकीत पक्षाने मुकुंद भास्कर यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र, मुकुंद भास्कर यांना उमेदवारी देण्याला तारा यादव यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याशी हे वर्तन केले, असे तारा यादव यांनी सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली. मुकुंद भास्कर यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे आणि अशा व्यक्तीला पक्षाने उमेदवारी देण्यावर आपण प्रश्न उपस्थित करत होतो, असे तारा यादव म्हणाल्या.
प्रियांका गांधी काय कारवाई करणार?
आपण आता प्रियांका गांधी काय कारवाई करणार याची वाट पाहत असल्याचे तारा यादव म्हणाल्या. एकीकडे आमच्या पक्षाच्या नेत्या हाथरस प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा म्हणून लढाई लढत आहे, तर दुसरीकडे पक्षाचे तिकीट एका व्यक्तीला दिले जात आहे. पक्षाचा हा निर्णय पक्षाच्या प्रतिमेला मलीन करेल, असे तारा शिंदे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
महिला आयोगानेही घेतली दखल
तर, महिला आयोगानेही या प्रकरणाची दंखल घेतली आहे. आम्ही या घटनेची दखल घेतली असून या घटनेदरम्यान २५ लोक एका महिला नेत्याला मारहाण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांनी राजकारणात आले पाहिजे असे आम्ही सांगत असताना हे एक गंभीर प्रकरण आहे. राजकारणातील लोक महिला कार्यकर्त्यांसोबत गुंडांप्रमाणे व्यवहार करत आहेत. अशा लोकांना शिक्षा मिळायला हवी, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times