Jayant.howal@timesgroup.com

मुंबई व परिसरातील (एमएआर विभाग) मेट्रोचे १४ मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर या दोन्ही प्रदेशांतील दूर होणार असून मुंबईतील वाहतूककोंडी १३७ टक्क्यांवरून ३३ टक्के, तर मुंबई परिसरातील कोंडी ९५ टक्क्यांवरून थेट नऊ टक्क्यांवर येईल. मेट्रोचे जाळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यात विस्तारणार आहे.

सर्व मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर रस्ते वाहतूककोंडी तसेच होईल, असा दावा सातत्याने एमएमआरडीएकडून केला जातो. या दावा सिद्ध करणारा सविस्तर तपशील एमएमआरडीएने दिला आहे.

सन २०३१पर्यंत २२५ स्थानकांचा समावेश असलेले ३३७ किमी अंतराचे मेट्रोजाळे मुंबई व परिसरात निर्माण होईल. या मार्गाचा २२ लाख ७६ हजार प्रवासी वापर करतील, असे एमएमआरडीएचा अभ्यास सांगतो. म्हणजे विविध माध्यमांतून प्रवास करणारे एवढे प्रवासी मेट्रोकडे वळतील.

सन २०१७च्या आकडेवारीनुसार १०३ लाख लोक रस्तेवाहतूक वापरतात. त्यापैकी १५.९ लाख कारने, २३.४ लाख बाइकने, ९.५ लाख रिक्षाने, १६.३ लाख टॅक्सीने, तर ३७.५ लाख लोक दररोज बसने प्रवास करतात. सन २०३१मध्ये मेट्रोमार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर रस्तेमार्गे प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण १०३ लाखांवरून ७७ लाखांवर येणार आहे.

उपनगरीय रेल्वे सेवेचा भारही मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणावर कमी होईल. सध्या रेल्वेने दररोज ८१ लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर रेल्वेची प्रवासी संख्या ६१ लाखांवर येईल, असा अंदाज आहे.

रस्ते व रेल्वे

सार्वजनिक वाहतुकीचा वापर ६५ टक्क्यांवरून ७२ टक्के होईल. खाजगी वाहतूक घटेल. हे प्रमाण ३४.६ टक्क्यांवरून २८.७ टक्क्यांवर येईल. भविष्यात मेट्रोचा वापर वाढणार असल्याने सध्या एखादा प्रवासी एमएमआरमध्ये रस्तेमार्गे १४ किमी अंतर प्रवास करत असेल, तर मेट्रोच्या पर्यायाने त्याचे अंतर १० किमीवर येईल. मुंबईत हेच अंतर ११ किमीवरून आठ किमीवर येईल. एमएमआरमध्ये रेल्वेने ३१ कि.मी प्रवास करणाऱ्याचे अंतर २५ किमीवर तर, मुंबईत हेच अंतर १६.३ किमीवरून १०.७ किमीवर येईल. मुंबईत आजच्या घडीला जे प्रवासी ५.९ किमीचा मेट्रो व मोनो प्रवास करतात, भविष्यात हेच प्रवासी किमान १६.४ किमीचा प्रवास करतील. वाहतूककोंडी कमी झाल्याने वाहनांचा वेग वाढेल. एमएमआरमध्ये सध्या २० किमी प्रतितासाने धावणारी वाहने ३७ किमी प्रतितास वेगाने, तर मुंबईत १७ किमी प्रतितासाहून ३० किमी प्रतितास धावतील.

वेळ व पैशांची बचत

मेट्रोमुळे दर वर्षी ४३०० कोटी रुपयांची बचत होईल. इंधन बचत आदी माध्यमांतून वर्षाला एकूण ७७०० कोटींची बचत होईल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here