ट्रम्प यांनी करोनाचे संकट गडद केले
संपादकीय मंडळातील ३४ जणांनी या संपादकीयावर हस्ताक्षर केले आहे. त्यातील ३३ जण हे अमेरिकन आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती ट्रम्प यांना हाताळता आली नाही. त्यांनी या संकटाला अधिकच गडद केले असल्याचे म्हटले आहे. या संपादकीयात ट्रम्प यांचे स्पर्धक जो बायडन यांना पाठिंबा दिला नाही. मात्र, अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला असल्याची चर्चा सुरू आहे. ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’चे मुख्य संपादक डॉ. एरीक रुबिन यांनी सांगितले की, या नियतकालिकेच्या संपादकीय इतिहासात ही चौथी घटना आहे. ज्यात सर्वच संपादकीय मंडळाने स्वाक्षरी केली आहे.
वाचा:
वाचा: ट्रम्प यांच्यावर निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर निशाणा साधताना म्हटले की, राजकीय नेतृत्वाने अमेरिकन नागरिकांना निराश केले आहे. अमेरिकेत सुरुवातीला खूपच कमी प्रमाणात चाचणी करण्यात आली. त्याशिवाय रुग्णालयात सुरक्षात्मक उपकरणांचीही कमतरता होती. मास्क घालणे, सोशल डिस्टेंसिंग, क्वारंटाइन आणि आयसोलेशनच्या मुद्यावरही राजकीय नेतृत्व कमी पडले असल्याची टीका करण्यात आली.
वाचा:
वाचा:
अमेरिकेत राजकारणाला महत्त्व
अन्न आणि औषध प्रशासन, राष्ट्रीय आरोग्य संस्थान आणि रोग नियंत्रण केंद्राचे राजकीयकरण करून त्याला कमकुवत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे अमेरिकेत हजारोजणांना नाहक प्राण गमवावे लागले. त्याशिवाय लोकांना आर्थिक आणि मानसिक त्रासाचाही सामना करावा लागला. करोनाच्या संसर्गाचा अमेरिकेतील गरिबांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times