गतवर्षी आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन छेडले होते. हे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा तेव्हा आरोप करण्यात आला होता. तेव्हा सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेने या प्रकाराचा कडाडून विरोध केला होता. आदित्य ठाकरे आंदोलकांच्या बाजूने उभे राहिले होते. त्यामुळं आज आरेतील मेट्रो कारशेडचा निर्णय घेतल्यानं आदित्य ठाकरेंनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यामातून आरेचा निर्णय जाहीर केला. आरेचा निर्णय जाहीर होताच आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर ‘आरे वाचले’ असं ट्विट केलं आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनीही आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. ‘पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यामध्ये अहोरात्र मेहनत केली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
आरेतील कारशेड कांजूरमध्ये
‘आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. त्याचबरोबर या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे. त्याचबरोबर आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे.’अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times