दुबई, : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम रचण्याची नामी संधी आहे. रोहित हा विक्रम रडून आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना यांना मागे टाकू शकतो. या सामन्यात रोहितला आयपीएलमधील एक अर्धशतकांच विक्रम खुणावत आहे. आजच्या सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावले, तर तो कोहली आणि रैना यांना मागे टाकू शकतो. त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतो.

आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर ३८ अर्धशतके आहेत. रोहितने यावेळी कोहली आणि रैना यांच्याबरोबर बरोबरी केलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावले तर त्याचे हे ३९ वे अर्धशतक ठरेल. त्याचबरोबर कोहली आणि रैना यांना मागे टाकून तो आयपीएलमधील भारताचा सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज ठरेल. पण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये मात्र रोहितला दुसरे स्थान मिळू शकते.

रोहितने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले तर तो आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरेल. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ही सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहेत. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये वॉर्नरने ४६ अर्धशतके झळकावलेली आहेत.

रोहितला या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये रोहितने दोन अर्धशतके लगावली आहे. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये रोहितने ३५.१६ च्या सरासरीने २११ धावा केल्या आहे, याटवेळी रोहित स्ट्राइक रेट १४५.५१ एवढा आहे. त्यामुळे रोहितला सातत्यपूर्ण फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित नेमका कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

आयपीएलच्या १३व्या हंगामात आज होणाऱ्या डबल हेडरमधील दुसरी लढत गुणतक्त्यातील दोन अव्वल संघामध्ये म्हणजेच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघात स्टार खेळाडू आहेत आणि त्यांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. मुंबईची सर्वात मोठी ताकद म्हणजे हा संघ कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नाही. रोहीत शर्मा, डीकॉक या सलामीच्या जोडीनंतर इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड हे धमाकेदार फलंदाज आहेत. अबुधाबीच्या मैदानावर १७० देखील चांगली धावसंख्या ठरू शकते. पण दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी पाहता २०० धावसंख्य देखील सुरक्षित वाटणार नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here