जून महिन्यात शर्मिष्ठा आणि तेजस यांचा साखरपूडा पार पडला होता. त्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुकता होती. सोशल मीडियावर फोटो शेअर करत शर्मिष्ठानं हे महत्त्वाचे आणि खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केलेत.शर्मिष्ठा आणि तेजस जानेवारी महिन्यापासूनच सारखपुडा आणि लग्नाचं प्लॅनिंग करत होते. एप्रिल महिन्यात साखरपुडा करण्याचं ठरलं होतं. परंतु अचानक लॉकडाउन घोषित झाल्यामुळं साखपुडा नंतर करण्याचं ठरलं होतं.
शर्मिष्ठानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं असून बिग बॉसमुळं ती चर्चेत आली होती. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिनं काम केलं आहे. ‘जो भी होगा देखा जयेगा’, ‘टॉम अँड जेरी’, ‘बायको असून शेजारी’, ‘शंभू राजे’ या नाटकात शर्मिष्ठानं काम केलं आहे.दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times