नवी दिल्ली: प्रवाशांना जलद गतीने त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) एक मोठी योजना तयार केली आहे. त्यानुसार, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना ताशी १३० किलोमीटर ते १६० किलोमीटरच्या वेगाने चालवण्याची तयारी रेल्वे करत आहे. या जलद गतीच्या गाड्यांमध्ये NON-AC कोच अर्थात स्लीपर आणि () असणार नाहीत.

तसे पाहिले असता मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या ताशी १३० किमी किंवा त्याहून अधिक गतीने धावल्यास नॉन-एसी कोचमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होतात. याच कारणामुळे अशा प्रकारच्या सर्व गाड्यांधील रद्द करण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सध्या ८३ लावण्याचा प्रस्ताव आहे.

असे असले तरी याचा अर्थ असा नाही की, आता नॉन एसी कोच असणारच नाहीत. खरे तर नॉन एसी कोच असलेल्या गाड्यांची गती एसी कोच असलेल्या गाड्यांच्या तुलनेत कमी असणार आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, एसी गाड्या ताशी ११० किमीच्या वेगाने धावणार आहेत. हे सर्व काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. या बरोबरच नव्या अनुभवांवरून धडा शिकूनच पुढील योजना तयार करण्यात येणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

या गाड्यांमधून जनरल आणि स्लीपर कोच हटवले जाणार

रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते डी. जे. नारायण यांनी माहिती देताना सांगितले की, अशा प्रकारच्या गाड्यांचे तिकीट देखील स्वस्त असणार आहे. मात्र, सर्वच नॉन एसी कोच एसी कोचामध्ये परिवर्तीत केले जातील असा चुकीचा समज करून घेण्याची काहीच आवश्यकता नाही. सध्या अधिकांश मार्गांवर मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची गती ताशी ११० कमी किंवा त्याहून कमी आहे. राजधानी, शताब्दी आणि दूरंतोसारख्या प्रीमियम गाड्या ताशी १२० किमीने धावतात.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here