आबुधाबी, MI vs DC : मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात सरस कोण, हे दिल्लीसह सर्वच संघांना दाखवून दिले. आजच्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर पाच विकेट्स राखून सहज विजय मिळवला. पण मुंबईने फक्त सामन्यातच नाही तर गुणतालिकेतही दिल्लीला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले.

दिल्लीविरुद्ध खेळण्यापूर्वी मुंबईच्या संघाने सहा सामने खेळले होते. या सहा सामन्यांमध्ये मुंबईने चार विजय मिळवले होते, तर दोन पराभव त्यांना पत्करावे लागले होते. त्यामुळे मुंबईचे आठ गुण होते आणि या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ हा दुसऱ्या स्थानावर होता. पण या सामन्यात विजय मिळवल्यावर मुंबईच्या संघाने १० गुण झाले आहेत, दिल्लीच्या संघाचेही समान १० गुण असले तरी चांगल्या धावगतीच्या जोरावर मुंबईने अव्वल स्थान पटकावले आहे. दोन्ही संघांचे समान १० गुण असले तरी फक्त रनरेटच्या जोरावर मुंबईने दिल्लीला गुणतालिकेत धक्का दिला आणि त्यांच्याकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे.

या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ हा १० गुणांसह अव्वल स्थानावर होता. कारण या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने सहा सामन्यांमध्ये पाच विजय मिळवले होते, तर त्यांना एका सामन्यात पराबव पत्करावा लागला होता. त्यामुळे दिल्लीचा संघ अव्वल स्थानावर होता. या सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचे आणि मुंबईचे समान १० गुण आहेत. पण चांगल्या रनरेटच्या जोरावर मुंबईच्या संघाने अव्वल स्थान पटकावले असून दिल्लीच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

दिल्लीच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. पण सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांची चांगलीच जोडी जमली. डीकॉक यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत होता आणि दमदार फटकेबाजीच्या जोरावर डीकॉकने आपले अर्धशतकही साजरे केले. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच दिल्लीच्या आर. अश्विनने डीकॉकला बाद केले, त्याला ३६ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावा करता आल्या.

डीकॉक बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी सूर्यकुमारने आपल्या खांद्यावर घेतली आणि फटकेबाजीला सुरुवात केली. सूर्यकुमारने चांगले फटके लगावत यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो जास्त काळ खेळू शकला नाही, त्याला दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कर्णधार श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. सूर्यकुमारला यावेळी ३२ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५३ धावा करता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here