काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून धोनीच्या मुलीला धमकी देण्यात आली होती. चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना गमवल्यानंतर एका युजरने बलात्काराची धमकी देणारा मेसेज पोस्ट केला होता.
या धमकी देणाऱ्या मेसेजवर अनेकांनी तीव्र शब्दात टीका केली होती. चेन्नईचा संघ सध्या चांगली कामगिरी करता आली नाही. त्यावर काहींनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती.
सामना गमावल्यानंतर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रोल केले जाते ही गोष्ट नवी नाही. पण चेन्नईच्या पराभवानंतर काही युझर्सनी महेंद्र सिंह धोनीची () पाच वर्षाच्या मुलगी झिवाला () धमकी दिली होती. याआधी देखील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर पत्नी आणि गर्लफ्रेंडला ट्रोल केले गेले होते. यात विराटने खराब कामगिरी केली की अनुष्काला ट्रोल गेले होते.
धोनीच्या संघाचा पराभव झाल्यानंतर त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला टार्गेट केले गेले. काही युझर्सनी अशा पद्धतीच्या पोस्ट फेसबुक आणि ट्विटवर केल्याचे आढळले आहे. यात बलात्काराच्या धमकीचा देखील समावेश आहे.
या घटनेवर अनेकांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अभिनेत्री नगमा यांनी यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times