मुंबईतील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गोरेगावच्या आरे कॉलनीतील आता कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा मुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय रास्तच आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाचे रविवारी स्वागत केले आहे. मागील फडणवीस सरकारच्या काळात वादात सापडलेल्या मेट्रो कारशेडचे कांजूरमार्ग येथे स्थलांतर करून मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या मनातील निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरे कॉलनीतील कारशेडला होणारा स्थानिक जनतेचा विरोध आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या मागणीचा विचार करून जबाबदारीने हा निर्णय घेतला आहे. हे कारशेड आरेमध्येच व्हावे म्हणून तत्कालीन सरकारने रात्रीच्या अंधारात आरे कॉलनीतील शेकडो झाडे कापून पर्यावरणाचा ऱ्हास केला आणि पर्यावरणाच्या प्रश्नावरील आपली वृत्ती दाखवून दिली होती. मात्र, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण व जनहिताचा निर्णय घेऊन रास्त निर्णय घेतला आहे, असे मलिक म्हणाले.
पर्यावरणप्रेमी, आरे कॉलनीतील आदिवासी आणि मुंबईकरांनी गेल्या सात वर्षांपासून सुरू केलेल्या मेट्रो-तीनच्या कारशेड विरोधातील आंदोलनाला मोठे यश आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे आरे कॉलनीतील जंगल अबाधित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मेट्रो- तीनचे कारशेड आता कांजूरमार्ग येथे असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या शेजारी उभे राहणार आहे. ही जागा फडणवीस सरकारच्या काळात ही निश्चित झाली होती. मात्र, त्यावेळेस तत्कालीन सरकारने या जागेकडे दुर्लक्ष केले होते.
आरेच्या कारशेडवरून मागील सरकारमधील भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. समृद्ध वनसंपदा असलेल्या आरेतील झाडे कापण्यास पर्यावरणवाद्यांचा स्पष्ट विरोध होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती देण्यात आली होती. या प्रश्नी अभ्यासगट नेमून आलेल्या अहवालाच्या आधारे हे कारशेड स्थलांतरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने घेतलेला आहे, असा टोला मलिक यांनी भाजप नेत्यांच्या विरोधास लगावला आहे. कांजूरमार्गला कारशेड स्थलांतरीत केल्यामुळे आठ किमीचा प्रवास वाढेल. पण यामुळे त्या भागातील सुविधा निर्माण होतील असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times