शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘मी दाऊद इब्राहिमला दम दिला होता’, असं वक्तव्य केलं. त्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी राऊतांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. निलेश राणेंनी संजय राऊत यांची तुलना थेट पिसाळलेल्या कुत्र्याशी केली आहे.
निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत एक ट्विट केलं आहे. ”खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्यासारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
निलेश राणे यांच्या ट्विटमुळे शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान अनेक गौप्यस्फोट केले. पत्रकारितेतील कारकिर्दीबद्दल सांगताना संजय राऊत यांनी दाऊदचा उल्लेख केला होता. ‘मी दाऊद इब्राहिमपासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊदला दम देखील दिलाय’, असं राऊत म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times