मुंबईः मुंबईसह उपनगरांत गेल्या १ तासापासून झाला आहे. इतका वेळ वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जातंय. अचानक वीज पुरवठा ठप्प झाल्यानं लोकलसह, परीक्षांवरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीवर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे. तो अवघ्या अर्धा-पाऊण तासांत पुन्हा सुरळीत होईल. आमचे विद्युत कर्मचारी तिथं युद्धपातळीवर काम करतायेत. व पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल,’ असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं आहे.

लोकलसेवा ठप्प

मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकल सेवेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेवरही ठप्प झाली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून लोकल एकाच जागी थांबली आहे असून लोकलमध्ये प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा लोकल सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या हार्बर मार्गावरील काही लोकल पुन्हा सुरू झाल्याचं, समजतंय

रुग्णालयात उपकरणं बंद पडण्याची शक्यता

मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here