मुंबई: सध्या घराघरांत चर्चा आहे ती म्हणजे आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या लग्नाची. ” मालिकेत सध्या या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असून याचे प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत आसावरी आणि अभिजीत यांचा हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत अभिजीत आणि आसावरी यांच्यातील गोड नातं प्रेक्षकांना अनुभवायला मिळत असून दोघांची प्रांजळ मैत्री आता वेगळ्या टप्प्यावर वेगळं वळण घेणार आहे. नुकतंच या मालिकेमध्ये आजोबाही त्यांचं मत बदलून या लग्नासाठी तयार झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता पुढची पायरी म्हणजे अभिजीत राजे आणि आसावरीचं लग्न. प्रेक्षकांना देखील या विवाह सोहळ्याबद्दल कमालीची उत्सुकता असून हा विवाहसोहळ्याचं शुटिंग पूर्ण झालं असून विशेष एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा:

विवाहसोहळ्याच्या एका प्रोमोमध्ये अभिजीत राजे लग्नाची तयारी करत असताना तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

शुभ्रानं जिंकली मनं
शुभ्रा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून जशास तसं वागणारी आणि वेळ प्रसंगी आपल्या सासूबाईंच्या मागं खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा ही प्रेक्षकांच्या घरातीलच एक व्यक्ती बनली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचं या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

पाहा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here