म. टा. प्रतिनिधी, : दारुची अवैध विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना दिल्यामुळे साथीदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या रागातून एका १२ वर्षीय केल्याप्रकरणी तिघा आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
अजय विजय गायकवाड (वय – २२, रा. कृष्णानगर, महमंदवाडी), सतीश गायकवाड ( ५४, रा. वानवडी बाजार), अक्षय जाधव (२०, रा. वानवडी) या तिघांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. या प्रकरणी आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझान झहीर अन्सारी या बारा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अमोल पवार या पोलीस कर्मचाऱ्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times