आबुधाबी: मॅच फिक्सिंग हा आयपीएलसाठी सर्वात जास्त संवेदशनशील मुद्दा आहे. पण मुंबई इंडियन्सच्या एका वादग्रस्त ट्विटनंतर आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग होते का? हा प्रश्न आता विचारला जात आहे. कारण रविवारी झालेल्या दिल्लीविरुद्धचा जिंकण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने आम्हीच जिंकणार, असे एक ट्विट केले होते. पण त्यानंतर मुंबईच्यासंघाने हे ट्विट डिलीट केल्याचेही पाहायला मिळाले आहे.

मुंबई इंडियन्सने रविवारी रात्री ७ वाजून ३८ मिनिटांनी एक ट्विट केल्याचे काही चाहत्यांनी पाहिले. या ट्विटममध्ये दिल्लीचा संघ १६३ धावा पूर्ण करेल, असे म्हटले होते. त्यावेळी दिल्लीच्या डावाचे दुसरे षटक सुरु होते. त्यावेळी दिल्लीची १ बाद ७ अशी अवस्था होती. त्यानंतर दिल्लीच्या संघाने २० षटकांत ४ बाद १६२ अशी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये फिक्सिंग होत आहे का, असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे.

दिल्लीचा डाव सुरु झाल्यावर आठव्या मिनिटालाच मुंबई इंडियन्सकडून हे ट्विट केल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ किती धावा उभारणार, हे मुंबईच्या संघाला सामन्याच्या आठव्या मिनिटालाच कसे समजले, असा सवाल चाहते विचारत आहेत. कारण सामन्याच्या आठव्या मिनिटाला फक्त दुसरेच षटक सुरु होते. त्यामुळे दोन षटकांच्या आधारावर मुंबईचा संघ दिल्ली किती धावा करू शकते, हे कसे समजू शकते, असाही प्रश्न चाहते विचारत आहेत.

मुंबई इंडियन्सने हे ट्विट केल्यावर काही चाहत्यांनी ते पाहिले. त्यानंतर वाद रंगायला सुरुवात झाली. हे कुठेतरी मुंबई इंडियन्सपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले. पण हे ट्विट मुंबई इंडियन्सने डिलीट करण्यापूर्वी काही चाहत्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढला होता आणि सध्याच्या घडीला ते चांगलेच व्हायरल होताना दित आहे.

दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला जिंकण्यासाठी १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here