मुंबई: व उपनगरांतील आज दुपारी सुमारे साडेतीन तास ठप्प होता. युद्धपातळीवर बिघाड दुरूस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असला तरी पाणीपुरवठ्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे. ( Latest Updates )

वाचा:

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने येथील ठाणे महानगरपालिकेचे व स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपीग बंद झाले होते यामुळे ठाणे शहरास होणारा बंद झाला होता. विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर पिसे व टेमघर येथील पंपीग सुरू करण्यात आले असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तरीही आज रात्री कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे ठाणे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

मुंबईतही पाणी पुरवठ्याला फटका बसला आहे. पालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा आज सकाळी काही तास खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. ज्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यावर त्याचा अंशतः परिणाम होऊन, काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. याअनुषंगाने आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असला तरी उद्या दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेने नमूद केले आहे. नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

वाचा:

दरम्यान, संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. तब्बल साडेतीन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. मात्र याचा खूप मोठा फटका अनेक सेवांना बसला. लोकलसेवा ठप्प होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक लोकल मध्येच अडकून पडल्याने प्रवाशांना रुळांवरून पायपीट करावी लागली. अनेक रुग्णालयांनाही याचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात एक उच्चस्तरिय बैठकही मुख्यमंत्र्यांनी घेतली. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपने या वीज गोंधळावरून सरकारला धारेवर धरले आहे. याप्रकरणी चौकशी करून जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here