नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार (Rahul Gandhi) यांनी हाथरस प्रकरणावरून (Hathras Case) उत्तर प्रदेश सरकारवर (UP Government) निशाणा साधला आहे. गुन्हेगारांना संरक्षण देणे सरकारचे काम नाही, असे राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले आहे. गुन्हेगारांना तुरुंगाच टाकले पाहिजे आणि पीडित कुटुंबाचे संरक्षण व्हायला पाहिजे. मात्र हे करत नाही, अशा शब्दांत राहुल गांधींनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पीडित कुटुंबाला भेटल्यानंतर आलेले अनुभव देखील कथन केले आहेत. हा केवळ एका महिलेचा मुद्दा नसून देशातील लाखो महिलांसोबत असेच होत आहे. जनतेने महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. ( criticizes over )

सरकार पीडित कुटुंबावर हल्ले करत आहे: राहुल गांधी
आपण पीडित कुटुंबाला भेटल्यानंतर या कुटुंबावर उत्तर प्रदेश सरकारने हल्ले सुरू केले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ते आपल्या व्हिडिओत म्हणतात, ‘काही दिवसांपूर्वी मी हाथरसला गेलो. जात असताना मला रोखले गेले. पहिल्यांदाच मला अटक करण्यात आली. दुसऱ्या वेळेला मी गेलो. मला हा डाव कळला नाही. मला का रोखले जात आहे? मला त्या कुटुंबाला भेटू का दिले जात नाही? त्यांच्या मुलीची हत्या झाली, त्यांच्या मुलीवर बलात्कार झाला, मला का रोखले जात आहे? जसा मी त्यांच्या घरात पोहोचलो, जसा मी कुटुंबीयांशी बोललो, तसे सरकारने पीडितांवर आक्रमणच सुरू केले. गुन्हेगारांना मदत करणे हे सरकारचे काम नसते. सरकारचे काम पीडितांना न्याय देण्याचे असते. गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्याचे असते. हे काम उत्तर प्रदेशचे सरकार करत नाही आहे.’

‘सरकारवर दबाव टाकला गेला पाहिजे’

तुम्ही तुमचे काम सुरू करा. गुन्हेगारांना तुरुंगात टाका. पीडितांना वाचवण्याचे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे काम करा. ही केवळ एका महिलेची कहाणी नाही. ही देशाच्या लाखो महिलांची कहाणी आहे. लाखो महिला सरकारकडे पाहत आहेत आणि सरकार आपले काम करत नाही आहे, अशी टीका करतानाच आम्हाला सर्वांना सरकारवर दबाव टाकायला हवा, असे अवाहन राहुल गांधी यांनी देशातील जनतेला केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘मुख्यमंत्र्यांसाठी पीडिता कोणीच नाही’

राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी देखील हाथरस प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पोलिसांवर निशाणा साधला होता. देशातील अनेक लोक दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत, असे रविवारी राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले होते. राहुल गांधी यांच्या मते मुख्यमंत्री आणि पोलिसांची देखील हीच मानसिकता आहे. मुख्यमंत्री आणि पोलिस म्हणतात की, बलात्कार झाला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि अनेक भारतीयांसाठी पीडिता कोणीच नव्हती, असे देखील राहुल गांधी यांनी पुढे म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here