कोल्हापूर: तालुक्यातील येथे रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसविल्याने पोलिसांनी तो हटविण्याचा आदेश दिला. मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्याने सायंकाळी पोलीस बंदोबस्तात पुतळा हटविण्यात आला. याला विरोध करणारे माजी आमदार यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. ( Latest Updates )

वाचा:

बांबवडे येथे बसस्थानकाशेजारी मोकळी जागा आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जागेत रात्री अज्ञातांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. त्यासाठी एका रात्रीत चबुतरा बांधण्यात आला. सकाळी हा पुतळा दिसताच ग्रामस्थही अवाक् झाले. पोलिसांना कोणताही थांगपत्ता न लागू देता अज्ञातांनी पुतळा बसवला, मात्र सकाळी पोलिसांना पुतळा दिसल्यानंतर गावात वाद सुरू झाला. कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो हटवा अशी भूमिका पोलिसांनी घेतली. पुतळा बसविण्यास विरोध नाही, पण रितसर परवानगी घेऊन तो बसवावा अशी सूचना पोलिसांनी केली. पण त्याला ग्रामस्थांनी विरोध केला.

वाचा:

माजी आमदार सत्यजीत पाटील सरूडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. पुतळा पोलीस ठाण्याच्या जवळ आहे, त्यामुळे तो सुरक्षित राहील. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याच्या रितसर परवानगीसाठी पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, तोपर्यंत हा पुतळा हटवू नये असे त्यांनी पोलिसांना सांगितले. गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण पुतळा हटवू देणार नाही, अशी भूमिका गावातील काही शिवप्रेमींनी घेतली आहे.

सकाळपासून उपविभागीय अधिकारी अमित माळी, उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, तहसीलदार गुरू बिराजदार, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले हे ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण सरूडकर यांच्यासह ग्रामस्थांनी पुतळा हटवण्यास जोरदार विरोध केला. यामुळे गावात तणाव निर्माण झाला. शेवटी सायंकाळी सात वाजता सरूडकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती हंबीरराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय बरगे व तीसपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तात पुतळा हटविण्यात आला. तो सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असून परवानगी मिळाल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

शाहूवाडीत उद्या बंद

पोलीस बळाचा वापर करत पुतळा हटवल्याने या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी शाहूवाडी तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलकापूर आणि बांबवडे या दोन्ही बाजारपेठाही उद्या कडकडीत बंद ठेवल्या जाणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here