मुंबई: राज्यातील करोनाची आकडेवारी दररोज दिलासा देणारी बातमी घेऊन येत आहे. आज मृत्यू, दैनंदिन रुग्णवाढ आणि रिकव्हरी रेट यात दिलासा देणारा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात गेले काही दिवस दररोज सरासरी ३०० करोना बाधितांच्या मृतांची नोंद होत होती तो आकडा आज १६५ पर्यंत खाली आला आहे. त्याचवेळी दैनंदिन रुग्णसंख्या थेट ७ हजारापर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी त्याच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्ण करोनातून बरे होऊन आज घरी परतले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या करोना रुग्णांची (अॅक्टिव्ह रुग्ण ) संख्या देखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री यांनी दिली. ( Latest Updates )

वाचा:

राज्यातील आजची करोना स्थिती दर्शवणारी आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिली आहे. त्यानुसार आज १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १२ लाख ८१ हजार ८९६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत व त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. यासोबतच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ८३.४९ टक्के एवढे झाले आहे.

वाचा:

आज राज्यात ७०८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील २.६४ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ (१९.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३ लाख २३ हजार ७९१ व्यक्ती होमक्वारंटाइन मध्ये आहेत तर २५ हजार ९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here