राजनाथ सिंह यांनी एका ऑनालाईन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या पुलांचं उद्घाटन केलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश केवळ संकटांशी मजबूतीनं सामना करत नाही तर या सीमावर्ती भागात मोठे आणि ऐतिहासिक बदल आणण्यासाठी प्रयत्नशील आहे’ असं यावेळी संरक्षणमंत्र्यांनी म्हटलंय.
वाचा :
वाचा :
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमावर्ती भागात रणनीतीच्या दृष्टीने हे पूल महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यातील ७ पूल लडाखमध्ये आहेत. या भागातच भारत आणि चीनच्या सेनेदरम्यान तणावाची स्थिती आहे.
दुर्गम टेकड्यांच्या या सीमावर्ती भागात सैनिक आणि हत्यारांची वाहतूक करण्यासाठी हे पूल अतिशय महत्त्वाचे आहेत. कमी वेळेद मोठ्या प्रमाणात रसद पुरवण्यासाठी या पुलांची मदत होणार आहे.
आणि चीन सीमेवरच्या परिस्थितीकडे इशारा करताना संरक्षण मंत्री म्हणाले ‘सर्व उत्तर आणि पूर्व सीमेवरच्या परिस्थितीची आम्हाला माहिती आहे. अगोदर पाकिस्तान आणि आता चीन… एका मोहिमेंतर्गत सीमावादाला जन्म दिला जातोय. या देशांची सीमा भारताशी जवळपास ७००० किलोमीटर लांब आहे. या भागांमध्ये तणाव कायम आहे’.
यावेळी, संरक्षणमंत्र्यांनी सांकेतिकरित्या अरुणाचल प्रदेशात ‘नेसिफु टनेल’ची आधारशिळा रोवलीय. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेश’नकडून (BRO) हे पूल अत्यंत कमी वेळेत उभारले आहेत.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times